ताज्या बातम्या

श्री प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

कराड : श्री प्रवीण काकडे हे धोंडेवाडी तालुका कराड जिल्हा सातारा येथील रहिवासी असलेले ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत आहेत. व अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट कराडचे अध्यक्ष म्हणून काम करीत असलेले सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्याच्या वतीने श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण चांदवड नाशिक येथे अहिल्यादेवी होळकर वाडा येथे दिनांक ११ व १२ एप्रिल रोजी करण्यात येणार आहे सदर कार्यक्रमास प्रा रामशिंदे सभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य मा माजी आमदार रामहरी रुपनवर श्रीमंत अमरजीत राजे जहागीरदार तळोदा संस्थान नंदुरबार खासदार रामराव वडकुते परभणी,आमदार गोपीचंद पडळकर, डॉ प्रकाश महानवर कुलगुरू सोलापूर विद्यापीठ संमेलनाचे संस्थापक अध्यक्ष डॉ अभिमन्यू टकले ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कर्णवर बाळासाहेब कर्णवर पाटील वाय चेअरमन श्री श्री सदगुरू साखर कारखाना राजेवाडी इत्यादी उपस्थित राहणार आहेत. ‌ प्रवीण काकडे हे गेली कित्येक वर्ष झाली सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करत आहेत. कोरोना काळात महाभयंकर संकट असताना त्यांनी डोंगर दर्या खोऱ्यातील विद्यार्थ्यांना सात जिल्ह्यांमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड सातारा कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करणेचा मोठा उपक्रम राबविला.मुलाना ऑनलाईन पद्धतीने डोंगर दर्या खोऱ्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येत नाही म्हणून प्रत्यक्ष वाडी वस्तीवर जंगलात जाऊन साहित्य वाटप केले डोंगरदऱ्या खोऱ्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत आपली स्वतःची नोकरी सांभाळून प्रत्येक सुट्टीच्या दिवशी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यासाठी जात असतात महाराष्ट्रातील सर्वात मोठे एमपीसी यूपीसी सेंटर कराड येथे उभे करण्याचा त्यांचा मानस आहे अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट कराडच्या वतीने प्रत्येक वर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कराड येथे आयोजित केला जातो व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. आत्तापर्यंत अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास प्रचार वतीने ५०००चे पुढे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून आर्थिक मदत करून शिक्षणाच्या प्रवाहात टिकून ठेवण्याचे काम प्रवीण काकडे यांनी केला आहे अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील सर्वात मोठा कर्तृत्ववान महिलांचा पुरस्कार सोहळा कराड येथे १४६ महिलांना देऊन सन्मानित करण्यात आले. पुणे येथे ९० महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले व नवी मुंबई येथे १४१ पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्याचबरोबर .कराड येथे २४५ विद्यार्थ्यांना शिक्षण रत्न पुरस्कार देऊन एकाच वेळी गौरविण्यात आले हे सर्व कार्यक्रम अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दीच्या निमित्ताने २०२५ रोजी एकाच वर्षात कार्यक्रम आयोजित केले होते प्रवीण काकडे यांना सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात योगदान दिल्याबद्दल २०१९ ला ॲम्युनेशन दारूगोळा फॅक्टरी पुणे भारत सरकार यांनी समाज रत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले त्यानंतर ईगल फाउंडेशन च्या वतीने एमआयटी कॉलेज पुणे येथे राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार २०२३ रोजी देण्यात आला त्यानंतर सिने अर्क प्रोडक्शन मुंबईच्या वतीने महाराष्ट्र रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले त्यांच्या या सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य ने घेतली त्याबद्दल तमाम महाराष्ट्रातील गोव्यातील व कर्नाटकातील धनगर व इतरही समाजा मध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Scroll to Top