गोडोली(विजय जाधव) : पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या सातारच्या दि रयत सेवक को- ऑपरेटिव्ह बँक लि. या बँकेने ३१ मार्च २०२६ अखेरची आर्थिक स्थिती
बँकेचा ऑडिट वर्ग सातत्याने ‘अ’ असून
एकूण ठेवी रु. १६९१.८८ कोटींवर , एकूण व्यवसाय २७६६.०९ कोटींवर , भागभांडवल
११६.९१ कोटींवर,कर्ज वितरण रक्कम रु. १०७४.२१ कोटी झाली असून सीडी रेशो ६३.४९ टक्के असून १४.९६ कोटी निव्वळ नफा झाला आहे. ती एफ एस डब्लू एम वर्गात असून यावर्षी ही ठेवी आणि व्यवसायात रयत बॅंक अग्रेसर असल्याचे चेअरमन नंदकुमार गायकवाड यांनी सांगितले.
२०२५-२६ या आर्थिक वर्षा ठेवीं तब्बल रु. ९६.२४ कोटींची वाढ होऊन एकूण ठेवी रु. १६९१.८८ कोटींवर तर एकूण व्यवसाय रु. १२५.७० कोटींनी वाढून रु. २७६६.०९ कोटींवर, भाग भांडवल रु. ८०.८४ कोटी , एकूण निधी रु. ११६.९१ कोटींवर पोहोचला आहे. कर्ज वितरण रक्कम रु. १०७४.२१ कोटी झाली असून सीडी रेशो ६३.४९ टक्के असून १४.९६ कोटी निव्वळ नफा झाला आहे.
एनपीए नियंत्रणात ठेवण्यात बँकेला यश आले असून ते ०.७६ टक्क्यांवर तर कर्जदार सभासदांना व्याजावर २ टक्के रिबेट देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.
गुंतवणुकीतही वाढ होत ती रु. ७९७.४६ कोटींवर पोहोचली आहे. डिजिटल सेवांमध्येही बँकेने मोठी झेप घेतली आहे. मोबाईल बँकिंग, UPI, IMPS, POS, पेमेंट गेटवे, QR कोड सुविधा तसेच Yotta कंपनीच्या क्लाऊड डेटा सेंटरद्वारे सायबर सुरक्षा मजबूत करण्यात आली आहे. बँकेला २०२५-२६ मध्ये विविध क्षेत्रांत तीन पुरस्कार मिळवून गुणवत्ता सिद्ध केली आहे.
या यशामध्ये व्हा. चेअरमन दिलीप डहाळे, संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी भास्कर कणसे , कर्मचारी यांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी बँकेच्या कार्याचे कौतुक केले आहे. संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, सचिव विकास देशमुख यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी रयत बँकेच्या संचालक आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.



