रामेघर – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून विभागात विविध विकास कामे होत आहेत.. आपला भाग दुर्गम असल्याने आजारी नागरिकांना तसेच आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा परिषद सदस्य श्री अजित संकपाळ व शिवसेना वैद्यकीय कक्ष यांच्या सौजन्याने मौजे रामेघर येथे रुग्णवाहिका (Ambulance) लोकार्पण करण्यात आले.
रामेघर येथे श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या धार्मिक कार्यक्रमाला जि. प. सदस्य अजित संकपाळ सातारा जिल्हा बॅक संचालक राजेंद्र राजपुरे , शिवसेना तालुका प्रमुख श्री गणेश उतेकर, संजय संकपाळ गुरुजी, सागर शेठ कदम, आनंद धनावडे, रामेघर सरपंच सुनील कदम, बाळकृष्ण कदम गुरुजी, शिवसेना नेते शंकरदादा कदम, सुरेश कदम, आदी मान्यवर व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते, हनुमान जन्मोत्सव सोहळा मध्ये
रामेघर येथे अखंड हरिनाम सप्ताह प्रवचन , हरिपाठ, कीर्तन, दिंडीचे आयोजन करण्यात आले होते, या सोहळ्यात समाजातील ज्येष्ठ नागरिकांना सन्मान करण्यात आला.
रुग्णवाहिका या विभागासाठी आवश्यक होती. लोकांची गरज ओळखून रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याबद्दल सन्मानीय जि प सदस्य यांचे कौतुक होत आहे.
हनुमान जन्मोत्सव सोहळा व रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा या कार्यक्रमाचे रामेघर गावाने उत्तम नियोजन केले होते.




