ताज्या बातम्या

निमसोड गटात रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याने श्री मांडवे यांचा कार्य शुभारंभ..

निमसोड(अजित जगताप) : राजकीय दृष्ट्या जागृत असलेल्या खटाव तालुक्यामध्ये निमसोड जिल्हा परिषद गटामध्ये संदीप मांडवे यांनी विजयी संपादन केला. पहिले काम त्यांनी रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याने सुरू केल्याने स्थानिकांची गैरसोय दूर झालेली आहे.
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडी वेळी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी खोटे आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सातारा जिल्हा परिषद सदस्य संदीप मांडवे व अनिल देसाई यांना खोट्या अपहरण गुन्ह्यामध्ये अडकवले. सातारा पोलिसांनी त्यांना हक्काच्या मतदानापासून वंचित ठेवले होते. या घटनेची नोंद संपूर्ण महाराष्ट्राने घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे युवा नेते व जिल्हा परिषद सदस्य संदीप मांडवे यांच्या कर्तबगारीला चांगलीच झालर आलेले आहे. भविष्यातील लोकप्रतिनिधी म्हणून आता त्यांच्याकडे पाहिले जात आहे. खटाव तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे . त्यामुळे मतदारांनी त्यांना मतदान केले होते. पक्षाच्या माध्यमातून विविध योजना प्रभावीपणे राबवणार नेते अशी संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची ओळख आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र निमसोड येथे जिल्हा परिषद सातारा यांच्या माध्यमातून नव्याने उपलब्ध झालेल्या रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा श्री मांडवे यांच्या हस्ते करून त्यांचा सन्मान करण्यात आला.

.यावेळी निमसोडचे सामाजिक कार्यकर्ते मोहनराव देशमुख , माजी सरपंच दिगंबर देशमुख, विलास घाडगे, पोपट घाडगे ,निलेश घाडगे, विजय देशमुख, धनाजी देशमुख, कृष्णराज देशमुख ,सुशांत देशमुख ,राजेंद्र कुंभार, लालासो देशमुख, प्रमोद देशमुख , तसेच मोहन शेठ घाडगे व वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजिंक्य पुस्तके व त्यांचे सर्व स्टाफ उपस्थित होता.

ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा गतिमान करण्यासाठी नेहमीच निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रयत्न केले जातात. लोकांना वेळेवर व चांगल्या दर्जाची वैद्यकीय सेवा मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याची जाणीव ठेवून प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी काम करत आहेत. नवीन रुग्णवाहिकेमुळे रुग्णांची सोय झालेली आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना त्वरित उपचार मिळण्यास मदत होऊन अनेकांचे प्राण वाचणार आहे.
._________________________________

महत्वपूर्ण चौकट—
जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या वेळेला घडलेल्या नाट्यामुळे खऱ्या अर्थाने रुग्णवाहिका गाजली होती. वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा परिषद सदस्य संदीप मांडवे व अनिल देसाई यांना पोलीस बंदोबस्तात साताऱ्यात आणण्यात आले होते. आज सन्मानाने निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेचे लोकार्पण सोहळा जिल्हा परिषद सदस्य श्री संदीप मांडवे यांच्या हस्ते करण्यात आले. भगवान के घर में देर है मगर अंधेर नही. याची चुणूक पाहण्यास मिळाली आहे.

________________________________.

फोटो– निमसोड तालुका खटाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेच्या लोकांनी सोहळा करताना मान्यवर (छाया– अजित जगताप, निमसोड)

Scroll to Top