मुंबई : जय महाराष्ट्र नगर बोरीवली पूर्व येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या विधानसभा प्रमुख सौ. रेखा शांताराम बोऱ्हाडे यांना मुंबईच्या महापौर सौ. रितू तावडे यांच्या शुभहस्ते आज भायखळा येथे आयोजित करण्यात आलेल्या एका शानदार सोहळ्यात शाल श्रीफळ पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रेखा बोऱ्हाडे यांनी बोरीवली पूर्व येथील महिलांच्या विविध प्रकारचे उपक्रम हाती घेतले. स्त्री शक्तीचा जागर करण्यासाठी अविश्रांत परिश्रम घेतले. त्यांच्या विधायक कार्याची दखल घेत मुंबई महापालिकेच्या नियोजन विभागाने आज आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात महापौर सौ. रितू तावडे यांनी उपमहापौर संजय घाडी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान केला. यावेळी सौ. रेखा बोऱ्हाडे यांनी आपले ‘ओंजळीतली फुले’ हे पुस्तक महापौर सौ. रितू तावडे यांना भेट दिले. याबद्दल महापौरांनी त्यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली .*




