ताज्या बातम्या

सातारा जिल्हा रुग्णालय विरोधात रिपब्लिकन सेना आक्रमक २० एप्रिल रोजी आंदोलन…

सातारा(अजित जगताप) : सातारा जिल्हा वाशी यांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयात गरजू रुग्णांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीन बाबत सामना करावा लागत आहे. याबाबत असंख्य लेखी व तोंडी तक्रारी रिपब्लिकन सेनेकडे आली आहे याबाबत जनतेचा आक्रोश दाखवण्यासाठी रिपब्लिकन सेना महाराष्ट्राचे नेते श्री रमेश अनिल उबाळे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक २० एप्रिल रोजी अमरण उपोषण करण्याच्या आंदोलनाचा निर्णय घोषित केला आहे. 20 एप्रिल पर्यंत सुधारणा न झाल्यास या रुग्णालयाच्या विरोधात होणाऱ्या सर्व जबाबदारीला रुग्णालय प्रशासन व पोलीस यंत्रणा जबाबदार राहणार आहे असे त्यांनी सूचित केले आहे. याबाबतची निवेदन साताराचे अपर जिल्हा अधिकारी श्री मलिकार्जुन माने यांच्याकडे देण्यात आले.

क्रांतिकारकांच्या सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नावाने जिल्हा शासकीय रुग्णालय कार्यरत आहे. याच जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात खाजगी व शासकीय कर्मचाऱ्यांना ह वैद्यकीय
बिल अदा करण्यासाठी टक्केवारी द्यावी लागत आहे. यापूर्वी लाचलचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकली होती. संबंधितावर गुन्हा दाखल केला होता. त्याचे नूतनीकरण जवळ आलेले आहे. असं आता भाकीत करण्यात येत आहे.सातारा जिल्हा रुग्णालयातून अर्भक मृत्यू प्रकरणी, तसेच बोगस प्रमाणपत्रे, बोगस वैद्यकीय बिले देताना टक्केवारी अविभाज्य भाग झालेला आहे. या निधीत खूप मोठे वाटेकरी असले तरी खुलेआम भ्रष्टाचाराचे सलाईन लावले जात आहे. या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींना निलंबित केले पाहिजे. कोणतेही सरकार सत्तेवर आले तरी यांची मक्तेदारी मोडून निघत नाही. यामुळे भ्रष्टाचाराचे कुराण झालेले आहे. याला जाब विचारण्यासाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने 20 एप्रिल रोजी सातारा जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर भर उन्हात आमरण उपोषण करण्यात येणार आहे.
सातारा जिल्हा शल्य चिकित्सक या पदावर असताना आरोग्य मंत्र्यांकडून त्रिसदस्य समिती चौकशी करत आहे. सदर शल्यचिकित्सक पदावर असल्यामुळे या चौकशीत ते पुरावे नष्ट करू शकतात व आपल्या पदाचा गैरवापर करून यातून निर्दोष सुटू शकतात, त्यामुळे त्यांना तात्काळ निलंबित करावे या चौकशीमध्ये त्यांच्या कार्यकाळात ज्यांना वैद्यकीय बिल अदा केलेले आहे. त्याची फिर तपासणी करावी. महत्वाचे म्हणजे या जगात येण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लहान बाळाची हत्या होते. अर्भक जन्माला येण्यापूर्वीच जिल्हा रुग्णालयाच्या गलथान कारभारामुळे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नावाने असलेल्या रुग्णालयातच अर्भकाला प्राण गमवावे लागतात. हे लांचनस्पद आहे. या प्रकाराचा आम्ही निषेध करतो. या सर्व प्रकरणाची चुकून चौकशी व्हावी. कारण हिंदुत्वाचे रक्षण करणाऱ्या सरकारमध्ये हिंदूंवर अन्याय होत आहे हे काही संघटना खपवून घेतील पण आम्ही खपवून घेणार नाही कारण आम्ही सर्व धर्म स्वभाव मानतो असे त्यांनी शेवटी स्पष्ट केले. रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय नेते श्री अनंतराज आंबेडकर व डॉ. सुशीलकुमार सूर्यवंशी, युवा नेते अमन आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या आंदोलनामध्ये रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र नेते श्री रमेश अनिल उबाळे, अशोक भिसे, विशाल भोसले ,नितीन रोकडे, गौतम रणदिवे, पद्माताई सुतार, रमेश गायकवाड, विशाल वायदंडे प्रकाश कांबळे संदीप सावंत , सरफराज बागवान, दीपक ओव्हळ, राजू कदम यांच्यासह रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. सदर निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, बाल कल्याण मंत्री ते सातारा पोलीस अधीक्षक, सातारा जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले आहेत.

________________________________

फोटो— रिपब्लिकन सेनेचे निवेदन अपर जिल्हाधिकारी श्री मल्लिकार्जुन माने यांना देताना रिपब्लिकन नेते रमेश अनिल उबाळे (छाया– शहाजी गुजर ,आनेवाडी)

Scroll to Top