ताज्या बातम्या

अचलगच्छाधिपती कलाप्रभसागर सुरीश्वरजींना गुजराती गौरव पुरस्कार ; डॉ हेमराज शाह यांच्या शुभहस्ते प्रदान

मुंबई : बृहन्मुंबई गुजराती समाज तर्फे आयोजित करण्यात आलेल्या गिरनार ॲवॉर्ड समारंभात अचलगच्छाधिपती कलाप्रभसागर सुरीश्वरजींना गुजराती गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. रविवारी त्यांचे मुंबईत एका कार्यक्रमासाठी आगमन झाले असतांना बृहन्मुंबई गुजराती समाजाचे संस्थापक अध्यक्ष डॉ हेमराज शाह यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत भेट घेतली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. याचवेळी डॉ हेमराज शाह यांनी अचलगच्छाधिपती कलाप्रभसागर सुरीश्वरजींना गुजराती गौरव पुरस्कार प्रदान केला. बृहन्मुंबई गुजराती समाज तर्फे गेल्या तीस हून अधिक वर्षांपासून समाजातील विशिष्ट व्यक्तींचा, खेळाडू, कलावंत आदींना प्रतिष्ठेचा राष्ट्रीय स्मारक गिरनार ॲवॉर्ड प्रदान करण्यात येतो. संतांच्या श्रेणीत अचलगच्छाधिपती कलाप्रभसागर सुरीश्वरजींना गुजराती गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. त्याप्रमाणे रविवारी हा गुजराती गौरव पुरस्कार डॉ हेमराज शाह यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी वयाची ८६ वर्षं पूर्ण करणाऱ्या डॉ हेमराज शाह यांना अखिल भारती अचलगच्छ संघा तर्फे गौरविण्यात आले. अचलगच्छाधिपती कलाप्रभसागर सुरीश्वरजींनी डॉ हेमराज शाह यांना आशीर्वाद देतांना सांगितले की, बृहन्मुंबई गुजराती समाजाचे महत्त्व अनोखे आणि त्यांचे योगदान अभूतपूर्व असेच आहे. अंधेरी येथील सात मजली गुजराती भवन म्हणजे आपला गौरव आहे. यात नवनीत परिवाराचे योगदान सुद्धा महत्वपूर्ण आहे. डॉ. हेमराजभाई शाह यांच्या ‘हेमूदादा’चा सुगंध या वर्षातही डोळे दीपविणारा आहे. अचल गच्छाधिपती प. पू. कलाप्रभ महाराज यांना गुजराती गौरव पुरस्कार बृहन्मुंबई गुजराती समाजचे अध्यक्ष डॉ हेमराज शाह यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी राजेश दोशी, एल एम शाह, चिमण मोता, दिनेश टी. शाह, हिराचंद दंड, नयन भेडा आणि डॉ. उर्मी पासद आदी मान्यवर उपस्थित होते.

Scroll to Top