ताज्या बातम्या

घाटकोपर येथे रावा संस्थेचा भव्य सांस्कृतिक सोहळा उत्साहात संपन्न

मुंबई : अंतरराष्ट्रीय रावा (Renaissance Artists and Writers Association – RAWA) यांच्या वतीने आयोजित भव्य सांस्कृतिक कार्यक्रम घाटकोपर (पश्चिम) येथील एसएनडीटी कॉलेजच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात आनंद मार्ग संस्थेचे संस्थापक श्री प्रभात रंजन सरकार यांच्या प्रतिकृतीस माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश संस्कृत साहित्य, कला आणि संस्कृतीचे जतन व संवर्धन करणे हा होता. कार्यक्रमाला सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष सारंग जगताप, आनंद मार्ग प्रचारक संघाचे आचार्य अनुध्यानानंद अवधूत, आचार्य हरगोविंद अवधूत, आचार्य कृपामयानंद, आचार्य जय शिवानंद अवधूत, आचार्य रवि प्रकाश आनंद अवधूत, आचार्य रागातीतानंद अवधूत (डी.एस. मुंबई), अवधूतिका आनंद सुभाषिता, अवधूतिका जैस्मिता आचार्य यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
तसेच प्रमुख अतिथी म्हणून मराठी चित्रपटसृष्टीतील नृत्यदिग्दर्शक नरेंद्र पंडित, रावा यूएसएचे अध्यक्ष संदीप खनुजा, नृत्यदिग्दर्शक रघुवीर खनुजा, महाराष्ट्र राज्याचे आरएसपी अधिकारी आमोघसिद्ध पाटील, डीडीएम न्यूजचे संपादक भिमराव धुळप, तसेच बजरंग बांदेकर, ध्यानेश कुमार, अरुण पारेख, गीता राऊल, धीमान जी, मुकेश जी, माधुरी दीदी, कुसुम दीदी, नीता दीदी आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात कथ्थक शिक्षिका अनुकृती यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सांस्कृतिक सादरीकरणे रंगली. माधुरी आणि मारुसिका यांनी कथ्थक नृत्य सादर केले, तर ओमकारने भरतनाट्यमची प्रभावी प्रस्तुती केली. पदमा, मयुरी, शिवानी, दिया, नेहा, पवित्रा, तेजश्री, प्रियंका यांनी विविध राज्यांतील लोकनृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
वीरेंद्र व त्यांच्या टीमने नाटिका सादर केली, तर स्नेहल, अंजना, राहुल, महेश यांनी ‘खंडोबा’ या विषयावर आधारित अभिनय सादर केला. विशेष आकर्षण ठरले ते लहानग्या कीमाएराने साकारलेले ‘कृष्ण’ पात्र, ज्याने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना “महाराष्ट्र सेवा श्री” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद पेडणेकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनुराग, रितिका, भावेश, अंकित, अनमोल, इंदु, आदित्य आणि विशाल या स्वयंसेवकांनी मोलाचे योगदान दिले.

Scroll to Top