ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील योगपटूंची चंदीगड मध्ये चमकदार कामगिरी.! एका सुवर्णपदका सह १६ पदकांची लयलूट

प्रतिनिधी : चंदीगड या ठिकाणी नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय नागरी सेवा योगासन क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रातील योगपटूंनी चमकदार कामगिरी करत तब्बल १६ पदकांची लयलूट केली आहे.

महाराष्ट्राच्या योगपटूंनी अखिल भारतीय नागरी सेवा योगासन क्रीडा स्पर्धेत श्रीमती अपर्णा जाधव, मानद सचिव, योग विभाग सचिवालय जिमखाना, यांच्या मार्गदर्शनाखाली ०१ सुवर्ण, ०८ रौप्य आणि ०७ कांस्य अशी एकूण १६ पदके जिंकत दैदीप्यमान कामगिरी करत घवघवीत यश मिळवले. केंद्रीय नागरी सेवा क्रीडा विभागाच्या वतीने चंदीगड प्रशासनाच्या यजमानपदाखाली पार पडलेल्या या स्पर्धेत २४ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतून सुमारे ४०० हून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. महाराष्ट्राच्या पुरुष संघाने सांघिक गटात उपविजेतेपद (द्वितीय पारितोषिक) पटकावले!
अखिल भारतीय नागरी सेवा योग स्पर्धा २०२५-२६: पदकविजेत्यांची यादी
🥇 सुवर्ण पदक (Gold Medal):
दत्ताराम सावंत – आर्टिस्टिक सोलो परफॉर्मन्स (५०+ वयोगट)
🥈 रौप्य पदक (Silver Medal):
योगेश्वर सानप व अभिजीत गायकवाड – आर्टिस्टिक पेअर (४० वर्षाखालील वयोगट)
लता शिरसाठ – ट्रॅडिशनल सोलो (५०+ वयोगट)
योगिता देसाई – आर्टिस्टिक सोलो (५०+ वयोगट)
शुभांगी सेजुळ व योगिता देसाई – आर्टिस्टिक पेअर (५०+ वयोगट)
दत्ताराम सावंत व नामदेव चौधरी – आर्टिस्टिक पेअर (५०+ वयोगट)

(एकूण ८ रौप्य)

🥉 कांस्य पदक (Bronze Medal):
श्रीकांत घोलकर व अभिजीत गायकवाड – रिदमिक पेअर (४० वर्षाखालील वयोगट)
दयानंद बिडवे – ट्रॅडिशनल सोलो व आर्टिस्टिक सोलो (४०-५० वयोगट)

योगिता देसाई – आर्टिस्टिक सोलो (५०+ वयोगट)

संगीता शेळके व भारती खराडे – रिदमिक पेअर (५०+ वयोगट)
(एकूण ७ कांस्य)

महाराष्ट्र योग संघाला एकूण १६ पदके तसेच पुरुष संघाने सांघिक कामगिरी करत उपविजेतेपदाचा चषक उंचावला.! या अभूतपूर्व यशाबद्दल महाराष्ट्राच्या संघावर सर्व स्तरातून अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Scroll to Top