ताज्या बातम्या
धारावीत लवकरच सुरु होणार… आंदोलनाचा धडाका धारावी बचाव आंदोलनची माहितीधारावी पुनर्विकास सर्वेक्षणात घोटाळ्याचा आरोप; ९६% रहिवासी अपात्र ठरल्याने संताप खा. वर्षा गायकवाड यांची सरकारकडे हस्तक्षेपाची मागणी; वसुलीचा खेळ थांबवण्याचे आवाहनमुंबईत कोलोरेक्टल कॅन्सरबाबत गंभीर अज्ञान; फक्त १८.९% लोकांना शौचात रक्त दिसणे हे लक्षण असल्याची माहितीछोटे पक्ष, गट, संघटनांनी रिपब्लिकन पक्षात सामील व्हावे ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आवाहन; राष्ट्रवादी चे नेते जीवन जाधव यांचा ही रिपब्लिकन पक्षात प्रवेशश्रीराम जन्मोत्सवानिमित्त जावळेवाडी येथे पारायण व अखंड हरिनाम सप्ताह….

छोटे पक्ष, गट, संघटनांनी रिपब्लिकन पक्षात सामील व्हावे ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आवाहन; राष्ट्रवादी चे नेते जीवन जाधव यांचा ही रिपब्लिकन पक्षात प्रवेश

मुंबई – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना प्रमाण मानून काम करणाऱ्या छोट्या पक्षांनी ; विविध रिपब्लिकन गट, विविध संघटनांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये झाले पाहिजे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष साकार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. संपूर्ण देशात रिपब्लिकन पक्ष आपण पोहचवला असून लवकरच रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळणार आहे; त्या दृष्टीने रिपब्लिकन पक्षाची घोडदौड सुरू आहे. रिपब्लिकन पक्षाला अधिक बळकट करण्यासाठी छोट्या रिपब्लिकन गटांनी, पक्षांनी आणि संघटनांनी रिपब्लिकन पक्षात सामील व्हावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले.

आंबेडकरी चळवळीतील विविध विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पक्षात सामील झाले पाहिजे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संकल्पना असणारा रिपब्लिकन पक्ष अधिक बलशाली करण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील विचारवंतांनीही रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा हाती घेतला पाहिजे. रिपब्लिकन पक्षात सामील होऊन रिपब्लिकन पक्ष अधिक बळकट केला पाहिजे असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी आज केले.

मुंबई मराठी पत्रकार संघात आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पीपल्स रिपब्लिकन पक्ष महाराष्ट्र चे अध्यक्ष मिलिंद सुर्वे;मुंबई अध्यक्ष मंगेश पगारे; राज्य महासचिव डॉ उमेश पवार; राज्य उपाध्यक्ष अशोक तांबे; शशिकांत शिंदे; मोहन बोदडे; नरसिम मुच्छा कट्टा; भीमसेन जाधव; रोहिदास वाघमारे; अनिल लागाडे ; गोविंद साळवी; विक्रम बमना; विजय पंडागळे; तुकाराम हेगडे; चंद्रकांत रुपेकर; कविताताई निकम; फिरोझ शेख; राजू पांचाळ; जोनभाई सांडेवाल; सारिकताई सकपाळ ; राजू कवंदर; लक्ष्मी अम्मा देवेंद्र; माधव कट्टार यांच्यासह शेकडो पीपल्स रिपब्लिकन महाराष्ट्र च्या कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पक्षा मध्ये जाहीर प्रवेश केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जीवन जाधव यांनी आपल्या समर्थकांसह आज रिपब्लिकन पक्षात केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांचे आशिर्वाद घेऊन यांच्या उपस्थितीत रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश केला. प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वातील पीपल्स रिपब्लिकन पक्षातून बाहेर पडून मिलिंद सुर्वे यांनी आपल्या नेतृत्वात पीपल्स रिपब्लिकन पक्षाचा वेगळा गट स्थापन केला होता. त्यांच्या नेतृत्वात मुंबई आणि राज्यातील अनेक पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते कार्य करीत होते. पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या एका गटाचे प्रमुख असणारे मिलिंद सुर्वे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह आज रिपब्लिकन पक्षामध्ये ना.रामदास आठवले यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.

त्याच बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जीवन जाधव आणि डॉ रश्मी जीवन जाधव यांच्या नेतृत्वात त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी आज केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आशिर्वाद घेऊन रिपब्लिकन पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. या जाहीर पक्ष प्रवेशाची घोषणा आज मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ना. रामदास आठवले यांनी केली. त्यावेळी त्यांनी रिपब्लिकन पक्षाचे अनेक छोटे मोठे गट आहेत. अनेक संघटना आहेत, अनेक आंबेडकरी विचारवंत चळवळीत कार्य करीत आहेत. आपले स्वतंत्रपणे आणि वेगवेगळे कार्य करणाऱ्या या छोट्या मोठ्या संघटना, गटांनी आणि पक्षांनी रिपब्लिकन पक्षामध्ये सामील होऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष व्यापक आणि मजबूत केला पाहिजे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्ष देशभर मजबूत होत आहे.
नागालँड आणि मणिपूर या दोन राज्यांमध्ये रिपब्लिकन पक्षाला मान्यता आहे. आता आणखी दोन राज्यात रिपब्लिकन पक्षाला मान्यता मिळाल्यास एकुण 4 राज्यात रिपब्लिकन पक्षाला मान्यता मिळेल. 4 राज्यात मान्यता असणाऱ्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळते. भाजप, काँग्रेस, बसपा, आणि आम आदमी पक्षानंतर रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून लवकरच मान्यता मिळेल. त्या दृष्टीने आपले काम सुरू असल्याचे ना.रामदास आठवले यांनी सांगितले.

सद्या देशात 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाला निवडणूक आयोगाने गन्ना किसान हे निवडणूक चिन्ह दिलेले आहे. आसाम, तामिळनाडू आणि केरळ या तीन राज्यांत रिपब्लिकन पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. पाँडिचेरी आणि पश्चीम बंगाल या दोन राज्यात रिपब्लिकन पक्षाचा पूर्णपणे भाजपला पाठिंबा आहे. आसाम, तामिळनाडू आणि केरळ मधील काही जागांवर रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवणार असून उर्वरित जागांवर रिपब्लिकन पक्षाचा भाजपला पाठिंबा राहील.असे ना. रामदास आठवले यांनी यावेळी स्पष्ट केले.

निवडणूक आयोगाने रिपब्लिकन पक्षाला मान्यता दिल्याने विविध राज्याच्या विधानसभा निवडणुकीत निवडणुका लढणे हे रिपब्लिकन पक्षाला क्रमप्राप्त आहे. त्यामुळे काहीं जागांवर रिपब्लिकन पक्षाने उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले असून उर्वरित सर्व जागांवर रिपब्लिकन पक्षाचा भाजपला पाठिंबा राहणार आहे. असे ना. रामदास आठवले यांनी यावेळी जाहीर केले. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, मुंबई अध्यक्ष सिध्दार्थ कासारे, युवक आघाडीचे महाराष्ट्र अध्यक्ष पप्पु कागदे, जिल्हा अध्यक्ष संजय पवार आदि अनेक मान्यंवर उपस्थित होते.

Scroll to Top