ताज्या बातम्या

राज्य शासनाच्या व्यसनमुक्ती सेवा पुरस्कारावर डॉ.संदीप डाकवे यांच्या लेखणीची मोहोर

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा सन २०२४-२५ चा मानाचा राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार पत्रकार डॉ.संदीप गयाबाई राजाराम डाकवे यांना प्रदान करण्यात आला. १५ हजार रुपये, मानपत्र, मानचिन्ह आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार डॉ. डाकवे यांना महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.हर्षदीप कांबळे, समाजकल्याण विभाग मुंबईच्या आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे, कीर्तनकार सत्यपाल महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्काराने डाॅ.संदीप डाकवेंच्या लेखणीवर महाराष्ट्र शासनाच्या पुरस्काराची मोहोर उमटवली आहे.
यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माहिती समाज कल्याण विभागाचे नवी मुंबईतील प्रादेशिक उपायुक्त, बाळासाहेब सोळंकी उपस्थित होते.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे हा पुरस्कार डाॅ.संदीप डाकवे यांनी पत्नी सौ.रेश्मा डाकवे, मुले चि.स्पंदन आणि कु.सांची यांच्यासह स्वीकारला.
या पुरस्कार वितरण सोहळयात मान्यवरांनी सर्व पुरस्कारप्राप्त व्यक्तींचे कौतुक करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

डॉ.संदीप डाकवे यांना यापूर्वी महाराष्ट्र शासनाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार, महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार, राजमाता जिजाऊ स्वावलंबन सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्कार, जि.प.कृषी विभाग सातारा यांचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार, ग्रामीण विकास यंत्रणेचा राजमाता जिजाऊ स्वावलंबन असे विविध पुरस्कार मिळाले आहेत.
सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल डाॅ.संदीप डाकवे यांचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई, शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार ॲड.जनार्दन बोत्रे, जिल्हा नियोजन समिती सदस्य संजय देसाई, पाटण तालुका बाजार समितीचे उपसभापती विलास गोडांबे, पं.स.सदस्य पंजाबराव देसाई, वांगव्हॅली पत्रकार संघ, स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट, शिवछत्रपती प्रतिष्ठान डाकेवाडी, समस्त ग्रामस्थ मंडळ डाकेवाडी तसेच विविध संघटनांच्या पदाधिकारी यांच्यासह अन्य मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Scroll to Top