कोकण : शाळा हे एक सर्वोत्तम संस्कार केंद्र आहे. देशाची भावी पिढीला, म्हणजेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक परिपक्वते प्रमाणे, संस्कारक्षम करण्याचे काम शाळा करत असते. अशा कौतुकास्पद शाळेचा अभिमान प्रत्येक आजी माजी विद्यार्थी व शिक्षकांबरोबर ग्रामंस्थांना असतो. असाच अभिमान, आज पराड गावात सर्वत्र फुलला आहे. याचा सुगंध जिल्हाभर पसरला असल्याने पराड गावाचा आदर्श, जिल्ह्याने घ्यावा असे कौतुकोद्गार शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी पराड येथे काढले.
पराड ता. मालवण या जि. प. शाळेला १० मार्च २०२६ रोजी शंभर वर्षे पूर्ण झालीत. या शतक महोत्सवानिमित्त शाळेचे भरभरून कौतुक करताना सामंत पीढे म्हणाले पराड हा श्रमीकांचा शेतीप्रधान गांव आहे.प्रत्येकजण मेहनती आहेत. या शाळेसाठी व शतकमहोत्सवासाठी येथील प्रत्येकांनी श्रमदान केल्याची मला माहिती मिळाली. म्हणुनच माझ्या तालुक्यातील एक गांव शासनाच्या निधीची वाट न पहाता श्रमदान कामे करुन यशस्वी होतो त्या गावासाठी व शाळेसाठी आम्ही सर्व विकासकामे करायला तयार आहेात.
येथे शिकलेल्या प्रत्येक माजी विद्यार्थी व शिक्षक आणि ग्रामस्थांना आज आपली शाळा शतायुषी झाल्याने अत्यंत आनंद झाला. या निमिताने ८ ते १० मार्च या कालावधीत भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावून शुभेच्छा दिल्या. केक कापून शाळेच्या शतक महोत्सवी वाढदिवस व स्मरणिकेचे प्रकाशन करून, शतक महोत्सव साजरा करण्यात आला.
१९६४ साली आदम शेख महम्मद, मोहम्मद शेख हुसेन व शेख परिवार पराड यांनी शाळेला विनामोबदला जमीन दिल्याने, कायमस्वरुपी दगडी पाटीचे अनावरण करण्यात आले. ग्रामस्थांच्या अथक श्रमदानातुन कार्यक्रम यशस्वी झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मालवण सभापती सौ. प्रज्ञा चहाण, गटविकास अधिकारी शाम चव्हाण, सोसायटी चेअरमन दीपा सावंत, सरपंच नेहा परब, मुंबई मंडळाचे अध्यक्ष आबा पाटकर, जया पराडकर, शतक महोत्सव समिती अध्यक्ष प्रदीप आवळेगांवकर, सरपंच रश्मी टेंबुलकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीपलक्ष्मी पराडकर, दीपा सावंत, आशा पाटकर, व अन्य मान्यवर ग्रा. पं. सदस्य विवेक जबड़े, अंकिता सावंत, वैष्णवी लाड, केंद्राप्रमुख नंदकिशोर गोसावी, रंगनाथ आजगांवकर, आतीक शेख, सलिम शेख, सागर मालवदे तंटामुक समिती अध्यक्ष बिपीन परब पोलीस पाटील विश्वास मालवणकर, मुख्याद्यापक कृष्णा कालकुंद्रिकर, शिक्षिका शीतल पाटील, महेश नाईक, रावजी चव्हाण, व ग्रामस्थ, विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी उपस्थित होते.
संतोष साटविलकर म्हणाले, शाळेच्या महोत्सवी सोहळ्याचे आपण सर्वजण साक्षिदार आहोत, हा माझ्यासाठी दुग्धशर्करा योग आहे. यानिमिताने शाळेच्या जुन्या आठवणीना उजाळा मिळाला. ८ मार्च रोजी या कार्यक्रमाला सुरुवात करून जागतिक महिला दिनाची जोड देत ही सुंदर संकल्पना, पराड या श्रमिक गावात पुस्तकी ज्ञान देताना स्वावलंबनाचे धड़े दिले जातात, असे सांगितले.
यावेळी शाळेतील दोन्ही शिक्षक यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत मुख्याध्यापक श्री. कृष्णा कालकुंद्रीकर व सहशिक्षिका श्रीम. शितल पाटील मॅडम यांना ग्रामस्थ व पालक यांच्यामार्फत मानपत्र, सौ. जया पराडकर मार्फत सन्मानचिन्ह, तसेच दुर्गादेवी मंडळ मार्फत सन्मानचिन्ह देऊन नागरी सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक मुख्याध्यापक कालकुंदीकर, सूत्रसंचालन राजा सामंत, आभार प्रदीप आवळेगांवकर योगी मानले.
फोटो पुढे आहे.




