ताज्या बातम्या

समाज कल्याण विभाग सातारा यांच्या वतीने डॉ. संदीप डाकवे यांचा सन्मान

तळमावले/वार्ताहर : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दिला जाणारा सन २०२४-२५ चा प्रतिष्ठित ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल पत्रकार डॉ. संदीप गयाबाई राजाराम डाकवे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या पुरस्काराबद्दल समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद सातारचे अधिकारी विद्यानंद चल्लावार, ज्योती काटकर (समाजकल्याण निरीक्षक) व अन्य मान्यवर यांनी डॉ.डाकवे यांचा पुष्पगुच्छ आणि शासन निर्णयाची (GR) प्रत देत अभिनंदन केले.
व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात डॉ.डाकवे यांनी केलेले प्रचार आणि प्रसाराचे कार्य मोलाचे असून त्यांच्या या कार्यामुळे समाजाला नवी दिशा मिळत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या पुरस्काराचे स्वरूप रु.१५,००० रोख, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि शाल असून हा पुरस्कार डॉ.संदीप डाकवे यांना पत्रकार या गटातून जाहीर झाला आहे. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात गुरुवार दि.26 मार्च, 2026 रोजी होणाऱ्या सोहळ्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अन्य मान्यवर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद सातारा कार्यालयाने केलेल्या या विशेष सत्काराबद्दल डॉ.संदीप डाकवे यांनी त्यांचे आभार मानले.

Scroll to Top