ताज्या बातम्या

घाटकोपरमध्ये ‘रावा’चा भव्य सांस्कृतिक सोहळा; पत्रकार भीमराव धुळप व हरिश्चंद्र जंगम यांना पुरस्कार

मुंबई (प्रतिनिधी) – रावा रेनास आर्टिसन रायटर्स असोसिएशन (RAWA) ही आनंद मार्ग प्रचारक संघाची सांस्कृतिक शाखा असून, संस्कृती संवर्धन आणि कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य संस्थेमार्फत केले जाते. या संस्थेची स्थापना २५ जानेवारी १९५८ रोजी श्री प्रभात रंजन सरकार यांनी केली होती. संस्कृत प्रतिभेला चालना देणे आणि सांस्कृतिक वारसा जतन करणे हा संस्थेचा प्रमुख उद्देश आहे.

आज ‘रावा’ ही संस्था जागतिक स्तरावर कार्यरत असून अनेक देशांमध्ये तिची उपस्थिती आहे. संस्थापक श्री प्रभात रंजन सरकार यांनी प्रभास संगीत समाजासाठी ५०१८ प्रभात संगीत रजनी देऊन सांस्कृतिक चळवळीला बळकटी दिली होती.
दरम्यान, ‘रावा’तर्फे भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन २८ मार्च रोजी सायंकाळी ५:३० वाजता घाटकोपर (पश्चिम) येथील एसएनडीटी कॉलेजच्या सभागृहात करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून श्री सारंग जगताप (सांस्कृतिक समिती अध्यक्ष), आचार्य प्रणेवेशानंद अवधूत (सरचिटणीस, आनंद मार्ग प्रचारक संघ), श्री नरेंद्र पंडित (नृत्य संचालक), संदीप खनुजा (अध्यक्ष, रावा यूएसए), रघुवीर (नृत्य संचालक), आमोघसिद्ध पाटील (आरएसपी अधिकारी, महाराष्ट्र राज्य), भिमराव धुळप (संपादक, DDM News), धेनेश कुमार (भुक्ती प्रधान, मुंबई), अरुण पारेख (भुक्ती प्रधान, ठाणे) तसेच आचार्य रघातीतानंद उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे नृत्यदिग्दर्शन कथ्थक शिक्षिका अनुकृती यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केले जाणार आहे.
याच कार्यक्रमात ‘धगधगती मुंबई’चे संपादक व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त पत्रकार भीमराव बाळकाबाई हिंदुराव धुळप यांना पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘मुंबई सेवा श्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. श्री धुळप यांना यापूर्वी विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थांकडून २५ हून अधिक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व वैभव पतसंस्थेचे चेअरमन श्री हरिश्चंद्र जंगम यांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
Scroll to Top