ताज्या बातम्या

संस्कृत कला-संवर्धनासाठी ‘राव’चा भव्य सांस्कृतिक सोहळा २८ मार्चला घाटकोपरमध्ये

मुंबई : राव रेनास आर्टिसन रायटर्स असोसिएशन (RAWA) ही आनंद मार्ग प्रचारक संघाची संस्कृत शाखा असून संस्कृत प्रतिभेला वाव देणे आणि सांस्कृतिक वारसा जपणे हा तिचा मुख्य उद्देश आहे. या संस्थेची स्थापना श्री प्रभात रंजन सरकार यांनी २५ जानेवारी १९५८ रोजी केली होती.
संस्कृत साहित्य, कला आणि संस्कृतीच्या जतनासाठी ‘राव’ आज जगभर कार्यरत असून प्रत्येक देशात आपली उपस्थिती निर्माण केली आहे. संस्थापक श्री प्रभात रंजन सरकार यांनी प्रभास संगीत समाजाला ५०१८ प्रभात संगीत रजनी समाजाला देणगी देऊन सांस्कृतिक कार्याला चालना दिली होती.
याच पार्श्वभूमीवर ‘राव’च्या वतीने एक भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम २८ मार्च रोजी सायंकाळी ५:३० वाजता घाटकोपर (पश्चिम) येथील एसएनडीटी कॉलेजच्या सभागृहात संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. प्रमुख पाहुण्यांमध्ये सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष श्री. सारंग जगताप, आनंद मार्ग प्रचारक संघाचे सरचिटणीस आचार्य प्रणेवेशानंद अवधूत, नृत्य संचालक श्री. नरेंद्र पंडित, रावा यूएसएचे अध्यक्ष संदीप खनुजा, नृत्य संचालक रघुवीर, आरएसपी अधिकारी (महाराष्ट्र राज्य) आमोघसिद्ध पाटील, DDM News चे संपादक भिमराव धुळप, मुंबईचे भुक्ती प्रधान धनेश कुमार, ठाण्याचे भुक्ती प्रधान अरुण पारेख तसेच आचार्य रघातीतानंद यांचा समावेश आहे.
या कार्यक्रमाचे नृत्यदिग्दर्शन कथ्थक शिक्षिका अनुकृती यांच्या मार्गदर्शनाखाली सादर होणार असून, विविध सांस्कृतिक कलाप्रकारांनी सजलेला हा सोहळा प्रेक्षकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.

Scroll to Top