ताज्या बातम्या

ग्रामपंचायत पोटनिवडणूक बिगुल वाजला… सातारा जिल्ह्यात ३४ थेट सरपंच, १७२ सदस्य पदांसाठी होणार निवडणूक; राज्यात २४४४ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

सातारा(विजय जाधव) : राज्यातील ग्रामपंचायतींमधील सदस्य आणि थेट सरपंच यांच्या निधन, राजीनामा, अनर्हता , इतर कारणांमुळे रिक्त झालेल्या जागांसाठी राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यात राज्यातील एकूण २४४४ ग्रामपंचायतींचे ४७१ थेट सरपंच आणि ३१२० सदस्यांच्या रिक्त जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यात
सातारा जिल्ह्यातील ३४ थेट सरपंच आणि १७२ सदस्य पदाच्या जागांसाठी मतदान होणार आहे.निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकांची पारंपारिक पद्धतीने राबवण्यात येणार आहे. तर ६ महिन्यांपेक्षा कमी कार्यकाळ शिल्लक असलेल्या सरपंच, सदस्य पदासाठी निवडणूक होणार असल्याचे आयोगाने स्पष्ट सांगितले आहे.

चौकट

जिल्ह्यातील पोटनिवडणूक कार्यक्रम

ग्रामपंचायती -१३८

एकूण जागा – २०६

थेट सरपंच रिक्त जागा- ३४

सदस्य रिक्त जागा – १७२

नामनिर्देशनपत्रे -७ ते १३ एप्रिल

छाननी, माघार- दि. १५ एप्रिल ते १७ एप्रिल

मतदानाचा दि. २८ एप्रिल

निकाल दि.२९ एप्रिल

चौकट

मुदत संपत आलेल्या पदासाठी निवडणूक होणार नाही.

ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपण्यास ६ महिने किंवा त्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे, अशा ठिकाणी या पोटनिवडणुका घेतल्या जाणार नाहीत, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

Scroll to Top