सातारा

(अजित जगताप) : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बळकटी करण्यासाठी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांनी जिल्हा परिषदे व पंचायत समितीची निर्मिती केली. त्याच सातारा जिल्ह्यामध्ये सत्तेच्या खेळात भाजप व साध्या वेशातील पोलिसांच्या युतीने अक्षरशा शिवसेना व राष्ट्रवादीच्या सातारा जिल्ह्यातील दोन मंत्र्यांना फटका बसला. दस्तुरखुद पालकमंत्री शंभूराज देसाई हे झटापटीत जखमी झाले. भाजप कार्यकर्त्यांपेक्षाही सातारा पोलिसांनी या निवडणुकीत सक्रिय सहभाग घेऊन लोकशाहीचा गळा घोटल्याची टीका आता सुरू झालेली आहे. याबाबत विधी मंडळाच्या अधिवेशनामध्ये जाब विचारण्यातील असं आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले.
या बाबत माहिती अशी की, सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील चौथ्या मजल्यावर छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सातारा जिल्हा परिषद इतर मागासवर्गीय अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी शुक्रवार दिनांक २० मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजल्यापासून शिवसेनेचे १५ व राष्ट्रवादीचे २० आणि भाजपचे २८ त्याचबरोबर तीन अपक्ष सदस्य सभागृहामध्ये उपस्थित राहण्यासाठी निघाले होते. त्यापूर्वीच राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई व संदीप मांडवे यांच्यावर अपहरण तक्रार आल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अधिक तपासासाठी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सातारा पोलिसांनी त्यांना उचलल्यामुळे त्यांना जिल्हा परिषद सभागृहांमध्ये हक्काचे मतदान करता आले नाही. ज्यांचे अपहरण झाले आहे. अशी तक्रार दिली होती ते सदस्य दिनकर तथा बापू शिंदे यांनी पोलिसांच्या समोरच सभागृहात येऊन मतदान केल्यामुळे भाजप समर्थक तोंडघशी पडले होते. तर राष्ट्रवादीचे कामेश कांबळे या मागासवर्गीय सदस्यांना भाजप मंत्र्यांनी दमदाटी केल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. विकास कामांसाठी जिल्हा परिषद सदस्य झालेल्या काही महिला वर्ग अशा प्रसंगामुळे अक्षरशा भेदरून गेल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर भीतीची छटा पसरली होती. सातारा जिल्हा परिषदेच्या इतिहासामध्ये काळा दिवस म्हणून आजच्या निवडीकडे पाहिले गेले आहे. या निवडणूक प्रक्रियेच्या वेळेला हजर असलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमध्येही भीतीचा सावट पसरला होता. सातारा जिल्ह्यात निपक्षपातीपणाने वार्तांकन करणाऱ्या काही प्रसारमाध्यमालाही अडवून खऱ्या अर्थाने हुकूमशाही कशी असते? याचा चित्र पाहण्यास मिळाले. अशी आता टीका होऊ लागलेली आहे. प्रसार माध्यमाचे प्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली. शिवसेनेचे कोरेगावचे भाजप प्रेमी आ. महेश शिंदे यांची पत्नी डॉक्टर प्रिया शिंदे या इतर मागासवर्गीय कुणबी मराठा दाखला घेऊन अध्यक्ष झाल्या तर भाजपचे मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे यांचे कट्टर समर्थक परळी विभागातील बडे प्रस्थ राजू भोसले यांना उपाध्यक्ष पदीवर सातारा जिल्हा भाजप नेत्यांच्या आग्रहखातिर संधी देण्यात आली. या दोन्ही नावांमुळे निष्ठावंत गटाच्या भाजपमध्येही काही प्रमाणात नाराजी पसरली आहे. वास्तविक पाहता राज्याचे ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. मनोज घोरपडे, आ. डॉक्टर अतुल भोसले व शिवसेनेचे आ. महेश शिंदे असा मोठा सातारा जिल्ह्यात भाजप ताकत असूनही स्थानिक पोलिसांची मदत घ्यावी लागली आहे. फोडाफोडीचे राजकारण करण्यात आले असले तरी शिवसेना व राष्ट्रवादी एक संघ राहिली आहे. आजच्या निवडीमध्ये खऱ्या अर्थाने लोकशाहीचा गळा घोटल्याचे टीका सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील व राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी केली आहे. ज्यांनी पक्षाच्या व्हिप विरोधात भाजपला मदत केली. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. असे स्पष्ट केले .
या भाजपच्या निर्णयाविरोधात मुंबई येथील विधिमंडळ अधिवेशनात महायुतीतील राष्ट्रवादी व शिवसेना वरिष्ठ नेत्यांशी विचार विनिमय करून चर्चा केली जाईल. तसेच अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत दाद मागण्यात येणार असे त्यांनी सांगितले. भाजपने दहशत केले असली तरी जनतेने त्यांना स्पष्टपणे नाकारले आहे. याचाही पत्रकार परिषदेत पुनर्विचार केला. सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी व निवडणूक निर्णय अधिकारी तथा सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याही भाजप प्रेमी पक्षपातीपणाबद्दल सडकून टीका करण्यात आली. दरम्यान, सातारा जिल्हा परिषदेच्या निवडी होऊन सुद्धा भाजपमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले नव्हते. उलट काही ठिकाणी शोककळा पसरल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी अध्यक्ष निवडीनंतर त्यांच्या दालनातच अंगाला लावलेला गुलाल सुद्धा झटकून टाकला. या प्रकारामुळे भाजपमधील निष्ठावंत व प्रामाणिकपणाने विकास कामांवर पक्षाची धुरा वाहणाऱ्या कार्यकर्त्यांनी ही चिंता व्यक्त केली आहे. आता सभागृहामध्ये होणाऱ्या चर्चेच्या बैठकीत पक्षीय राजकारण न आणता विकास कामावर चर्चा झाली पाहिजे. अशी अपेक्षा सर्व मतदारांनी केलेली आहे. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये झालेल्या प्रकाराने भाजप समर्थकांनी सुद्धा असे घडायला नको होते. असे सांगून जास्त प्रतिक्रिया देणे टाळले. जिल्हा परिषदेमध्ये अनधिकृत पणाने प्रवेश देणाऱ्या पोलिसांची चौकशी करावी अशी मागणी पुढे आलेली आहे. ______________&_&&______
फोटो– सत्ता संघर्ष नंतर भाजप जि . प अध्यक्ष, उपाध्यक्ष च्या निवड करताना (छाया– अजित जगताप, सातारा)




