प्रतिनिधी : श्री प्रवीण काकडे रा. धोंडेवाडी ता. कराड जि सातारा येथील रहिवासी असलेले समाज रत्न प्रवीण काकडे यांची ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली च्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी फेर निवड झाली आहे. ही निवड राष्ट्रीय अध्यक्ष श्री अजयपाल सिंह होळकर यांनी दिल्ली येथे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर केली आहे. प्रवीण काकडे हे गेल्या कित्येक वर्षांपासून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करत आहेत. डोंगर, द-या खोऱ्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ऑल इंडिया धनगर समाज महासंघा मध्ये जिल्हा उपाध्यक्ष पदापासून ते महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत मजल मारली आहे. संघटनेमध्ये श्री अमरजीत राजे जागिरदार तळोदा संस्थान नंदुरबार यांचे मार्गदर्शना खाली व श्री सुनील शेंडगे उद्योगपती व उल्हास राव वाघमोडे मुंबई यांचे सहकार्य मुळे, कै सुर्यकांत बारगळ इंदौर कै उत्तमराव लबाते व कै राजाभाऊ चोरमले यांच्या आशीर्वादाने संघटनेमध्ये काम करणेस सुरुवात केली. तेव्हा पासून आजपर्यंत प्रत्येक सुट्टीच्या दिवशी सामाजिक बांधिलकी म्हणून सुट्टीच्या दिवशी समाजासाठी काम करत आहेत गेले पंचवीस वर्षे झाली ते सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत आजही ते कोणत्याही पक्षाचे सभासद नाही हे विशेष आहे. कायम समाजाशी व डोंगर द-या खोऱ्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न हे उल्लेखनीय कामगिरी आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे त्रि शताब्दी जयंती निमित्ताने कर्तृत्ववान महिलांचा पुरस्कार संपुर्ण महाराष्ट्रात राबविला त्यामध्ये कराड येथे १४६पुणे येथे ९० मुंबई मध्ये १४१ महिलांचा सन्मान केला.. अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी जयंती निमित्ताने कराड येथे २४५ विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय शिक्षण रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हे सर्व ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली व अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट कराड चे वतीने करण्यात आले. आपण आपल्या ज्ञानाचा शिक्षणाचा उपयोग गोरगरीब जनतेला आधार देण्यासाठी म्हणून झाला पाहिजे यासाठी प्रयत्न. लवकर ते महाराष्ट्रा मधील सर्वात मोठे अत्याधुनिक एम.पी एसी,यूपीएससी सेंटर कराड येथे उभे करणेसाठी प्रयत्न करत आहेत. लवकरच त्यांची घोषणा केली जाणार आहे. अशा या सामाजिक व शैक्षणिक चळवळीला महत्त्व देणारे व्यक्तिमत्त्वास सर्व स्तराहून अभिनंदन शुभेच्छा देण्यात येत आहेत.




