मुंबई (शांताराम गुडेकर ) : शिवसेना पक्षाचे मुख्य नेते,महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री,आरोग्य दूत सन्मा.एकनाथजी शिंदे व मा.खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे व कार्याध्यक्ष राम हरी राऊत यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे उपाध्यक्ष श्री.जितेंद्र दगडूदादा सकपाळ यांच्या उपस्थितीत चैत्र पाडव्याचे औचित्य साधून दारुखाना विभागातील मीरा दातार दर्गाह गल्ली येथे शाखा क्र.२०९ अंतर्गत शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने गरजू जेष्ठ नागरिकांना मदत म्हणून वॉकर,आधारासाठी स्टिक व इलेक्ट्रिक हॉट वॉटर बॅग या साहित्याचे वाटप म.शाखा संघटिका सौ.अश्विनी खटावकर,शाखा स.समन्वयक श्री.जनार्दन सरगर (शेठ), यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना वैद्यकीय कक्षाचे दक्षिण मुंबई विभाग प्रमुख श्री.ललित शिंदे,उपशाखाप्रमुख श्री.विशाल जावळे, म.उपशाखा संघटिका नासिमा शेख,सरिता नायर,गटप्रमुख श्री.मंगेश वाकोडे,श्री.मिलिंद इंदुलकर,श्री.रवींद्र विद्यागर,श्री.सुनील सकपाळ व इतर पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.




