ताज्या बातम्या

वरळीत भक्तिभावात साजरा झाला श्री काळभैरवनाथांचा भंडारा उत्सव

मुंबई(अशोक साळवे) : वरळी येथे श्री काळभैरवनाथांचा सालाबादप्रमाणे होणारा भंडारा उत्सव रविवार, दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी अत्यंत भक्तिभावात आणि उत्साहात संपन्न झाला. “कोणी रंक असो वा राव, हृदयी धरूनी भाव” या भावपूर्ण प्रार्थनेप्रमाणे काळभैरवाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.
या पवित्र उत्सवात श्री काळभैरवनाथांची विधिवत पूजा-अर्चा, आरती व धार्मिक विधी पार पडले. चंद्र, सूर्य व अग्नीचे तेज धारण करणाऱ्या काळभैरवाच्या दर्शनाने भाविक भारावून गेले होते. त्रिशूळधारी, संकटी धावून येणाऱ्या प्रभूच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
उत्सवाच्या निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व स्तरातील भाविकांनी एकत्र येत महाप्रसादाचा लाभ घेतला. अत्यंत शिस्तबद्ध आणि सुंदर पद्धतीने हा उत्सव आयोजित करण्यात आला होता. आयोजकांच्या नियोजनबद्ध व्यवस्थेमुळे कार्यक्रम सुरळीत पार पडला. या भक्तिमय सोहळ्याने वरळी परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते

Scroll to Top