ताज्या बातम्या
यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार २०२६ वितरण सोहळा १५ ऑगस्टला वाशीत आमदार चित्रा वाघ, विजय चौगुले, मनोज सानप यांच्यासह मान्यवरांची उपस्थितीअवघ्या १ वर्षे ११ महिन्यांच्या नित्याची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये विक्रमी नोंद; जिंतीच्या कन्येची राष्ट्रीय पातळीवर चमकशिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण क्षेत्रातील युगपुरुष हरपलाअनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणात कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही उपवर्गीकरणाबाबत हरकतींची सुनावणी झाल्यानंतरच अंतिम निर्णय – मंत्री संजय शिरसाट‘प्रताप सरनाईक’ यांच्या निर्णयाला प्रवाशांचा कौल;कल्याण – मुरबाड मार्गावर एसटीची प्रवासीसंख्या दुपटीहून अधिक वाढली!

विळे येथील जि.प. मराठी शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; अ‍ॅड. स्मिता चिपळूणकर यांची कुटुंबासह उपस्थिती

विळे (ता. माणगाव, जि. रायगड) : आज २६ जानेवारी रोजी विळे येथील रा. जि. प. मराठी शाळा, विळे येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास जर्नालिस्ट असोसिएशनच्या नॅशनल प्रेसिडेंट अ‍ॅड. स्मिता चिपळूणकर यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण, देशभक्तीपर गीतं आणि विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून शाळा परिसर देशप्रेमाच्या भावनेने भारावून गेला. अ‍ॅड. स्मिता चिपळूणकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षण, संस्कार आणि संविधानाच्या मूल्यांबाबत मार्गदर्शन केले. आपल्या गावातील आणि शाळेतील कार्यक्रमात सहभागी होताना त्यांनी विशेष आनंद व्यक्त केला.
या वेळी शिक्षकवर्ग, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने “माझं गाव, माझी शाळा, माझा अभिमान” ही भावना प्रत्येकाच्या मनात ठसली. गावातील शाळेत साजरा झालेला हा प्रजासत्ताक दिन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.

Scroll to Top