ताज्या बातम्या

कराडमध्ये बौद्ध महासभेच्या प्रियांका थोरवडे यांच्या वतीने आदर्श उपक्रम: हळदी कुंकवा निमित्त स्त्री रत्नांची पुस्तके दिली भेट

कराड (ज्ञानेश्वर शेवाळे) कराड शहर येथे प्रथमच भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ उत्साहात संपन्न झाला, थोरवडे कुटुंबीयांच्या घरी सावित्रीबाई फुले व माता रमाई यांच्या प्रतिमांचे पूजन करून समारंभात सुरुवात करण्यात आली, या समारंभात विशेषता महिलांना वान म्हणून आदर्श स्त्री रत्नांची पुस्तके भेट देण्यात आली, यावेळी भारतीय बौद्ध महासभेच्या शिक्षिका प्रियांका थोरवडे, सुदर्शना थोरवडे, या सह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या, यावेळी बोलताना सुदर्शना म्हणाल्या की हळदी कुंकू हा फक्त विधी नसून तो स्त्रीत्वाचा उत्सव व सामाजिक ऐक्य व समृद्धीची प्रार्थना आहे, आयुष्यात आलो आहो तर फक्त माणसं कमवूया हीच शिकवण आपणास तथागतांनी दिले आहे.

Scroll to Top