ताज्या बातम्या
धारावीतील १०×१० च्या घरातून मानवतेची मोठी सेवा; टाटा मेमोरियल रुग्णालयातील कॅन्सर रुग्णांसाठी सौ. सविता होलमुखे यांचे १३ वर्षांपासून दररोज २५० जणांना विनामूल्य अन्नदानलोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जयंतीनिमित्त दिनांक १० मार्च रोजी मुंबईत भरगच्च कार्यक्रम..साप्ताहिक आम्ही मुंबईकर व्दारा पुरस्कार सोहळा मोठ्या जल्लोषात संपन्नईगल फौंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त कवी केशवसुत स्मारक मालगुंड येथे महिला गौरव सोहळा संपन्नदोन तरुणांचा मलम्यात गुदमरून दुर्दैवी मृत्यू पाईपलाईनसाठी काढलेल्या चरीत काम करताना मलमा कोसळून दुर्दैवी घटना; मनव परिसरात शोककळा

घराणे शाही बळकट करण्यासाठी पाळीव प्राण्यांनाही निवडणुकीत सहभागी करावे- पंजाबराव पाटील

सातारा(अजित जगताप) : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये घराणेशाही व कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी देण्याचा सपाटा राजकीय पक्षांनी लावलेला आहे. काही वेळेला त्याच घरातील पाळीव प्राण्यांना निवडणुकीत सहभागी केले तर वावगे ठरणार नाही. अशी उपरोधात्मक मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते पंजाबराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी प्रस्थापित काही घराणेशाहीतील व्यक्तींना राजकीय पक्ष संधी देतो. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी मिळत नाही. तशीच अवस्था प्रस्थापित राजकीय घराण्यातील मांजर, गाढव, बैल , गाई व कोंबड्या, शेळी, बोकड, मेंढी, उंट अशा लाडक्या मुक्या प्राण्यांची होत असावी. त्यांना ही उमेदवारी व मतदानाचा अधिकार मिळावा. यासाठी प्राणीशाही मार्गाने विचार व्हावा. अशी उपरोधत्कमक मागणी केल्याने राजकीय पक्षाच्या नेत्यांना आत्मचिंतन करावे लागत आहे.
सध्या प्रस्थापित नेत्यांनी सर्वच निवडणुकांमध्ये स्वतःच्या कुटुंबातील अकार्यक्षम व कोणताही सामाजिक कार्यात गंध नाही. नेत्यांचे सेवेकरी व लबाडीच्या पैशातून निवडणुकीची हौस भागविणाऱ्या व्यक्तींना काही ठिकाणी उमेदवारी जाहीर झाली आहे. यासाठी दरोडेखोऱ्यांना उचलू लागणारे छोट्या घराणेशाहीचे सराईत चोर सुद्धा सामील झाले आहेत. असेच चित्र दिसत आहे. या बाबत खेद करण्यापेक्षा प्राण्यांवर प्रेम करण्याचा या निमित सल्ला देण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे. असे ही श्री. पाटील यांनी नमूद केले आहे.
सर्व निवडणुकीत उभे करण्याची काहींना निवडणूक लढवणे हा जन्मसिद्ध हक्क आहे असे वाटते. परंतु ,काही नेत्यांना इच्छा अ�

Scroll to Top