ताज्या बातम्या
धारावीकरांना ५००, चाळी-इमारतीतील रहिवाशांना १,००० चौ. फुटांची घरे द्या ; मास्टर प्लॅन व पुनर्वसनाची कायदेशीर हमी मिळेपर्यंत करार न करण्याचे आवाहन‘वाजवा शाळेचा गजर, नको रे बाबा पुन्हा गेट टू गेदर!’ जुन्या आठवणी, मैत्री आणि नातेसंबंधांचा वास्तववादी वेध; आवर्जून पाहावे असे नाटकखारघर हिल महापौर मॅरेथॉन’ स्पर्धेत आयुक्त डॉ. शिंदे यांची यशस्वी धावगणेशोत्सवाच्या उत्साहाला गालबोट! २२ फुटी ‘भुलेश्वरचा राजा’ अचानक कोसळला; २ जणांचा मृत्यू, ५ जखमी”व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

“मी कोकणी उद्योजक पुरस्कार” मुंबईतील शानदार सोहळ्यात संदेश जिमन यांना प्रदान

मुंबई (शांताराम गुडेकर ) शिवभक्त कोकण व निलक्रियेटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्यावसायिक सन्मान सोहळा 'मी कोकणी उद्योजक' आज मुंबईतील चर्नी रोड येथील साहित्य संघ नाट्यगृहात विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या सोहळ्यात कोकणचे सुपुत्र, सामाजिक, माहिती अधिकार कार्यकर्ते, पत्रकार, रेल्वे मॅन श्री. संदेश जिमन यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी त्यानी आजपर्यंत रेल्वेच्या सुविधा संगमेश्वर तालुकावासीयाना मिळण्यासाठी केलेल्या संघर्षाचा आढावा घेतला. हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून तालुक्यातील प्रत्येकाचा आहे.तालुक्यातुन रेल्वेने प्रवास करणा-या सर्व प्रवासी वर्गाला मी हा संपर्पित करतो असे संदेश जिमन यांनी नम्रपणे नमुद केले.रेल्वेच्या सोयी सुविधांसाठी २४ तास निस्वार्थीपणे संघर्ष करणा-या संदेश जिमन याना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे रत्नागिरी जिल्हा, संगमेश्वर तालुका मधील अनेक मान्यवर सह सर्व स्तरातुन अभिनंदन होत असून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Scroll to Top