ताज्या बातम्या

कराड नगरपालिकेच्या निवडणुकांत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा सहभाग; नागरिकांना मोठ्या संख्येने मतदानाचे आवाहन

कराड(प्रताप भणगे) : कराड नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांनी आपल्या कुटुंबियांसह कराड शहरातील यशवंत हायस्कूल मतदान केंद्रावर हजेरी लावत लोकशाही हक्क बजावला. साधेपणाने मतदान केंद्रावर आगमन करत त्यांनी नियमानुसार मतदान प्रक्रिया पूर्ण केली.चव्हाण यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनीही मतदान करून लोकशाही बळकटीसाठी सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले.मतदानानंतर माध्यमांशी बोलताना चव्हाण म्हणाले, “नगरपालिका ही शहराच्या विकासाचा पाया आहे. प्रत्येक मत महत्त्वाचे असून नागरिकांनी आपला हक्क नक्की बजावला पाहिजे.”कराड शहरात मतदानाची उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली असून नागरिकांमध्येही मोठा सहभाग पाहायला मिळत आहे.

Scroll to Top