ताज्या बातम्या

मुंबईत १ ते २ डिसेंबरला ३० तास जलवाहिनी छेद-जोडणी; ११ विभागांत पाणीपुरवठा कमी दाबाने किंवा पूर्ण बंद

मुंबई(मंगेश कवडे) : अमर महल भूमिगत बोगदा शाफ्ट जोडणीसाठी ३००० मिमी मुख्य जलवाहिनीवर २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीची छेद-जोडणी १ डिसेंबर रोजी सकाळी १० ते २ डिसेंबर दुपारी ४ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. या कामामुळे शहर व पूर्व उपनगरातील एकूण ११ विभागांमध्ये पाणीपुरवठा प्रभावित होणार असून, ठिकठिकाणी कमी दाबाने किंवा पूर्णत्वाने पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

छेडा नगर जंक्शन, घाटकोपर परिसरात होणाऱ्या या कामामुळे ए, बी, सी, ई, एफ दक्षिण, एफ उत्तर, एल, एम पूर्व, एम पश्चिम, एन व एस विभागांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे.

पालिका प्रशासनाने नागरिकांना आवश्यक पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Scroll to Top