ताज्या बातम्या
धारावीकरांना ५००, चाळी-इमारतीतील रहिवाशांना १,००० चौ. फुटांची घरे द्या ; मास्टर प्लॅन व पुनर्वसनाची कायदेशीर हमी मिळेपर्यंत करार न करण्याचे आवाहन‘वाजवा शाळेचा गजर, नको रे बाबा पुन्हा गेट टू गेदर!’ जुन्या आठवणी, मैत्री आणि नातेसंबंधांचा वास्तववादी वेध; आवर्जून पाहावे असे नाटकखारघर हिल महापौर मॅरेथॉन’ स्पर्धेत आयुक्त डॉ. शिंदे यांची यशस्वी धावगणेशोत्सवाच्या उत्साहाला गालबोट! २२ फुटी ‘भुलेश्वरचा राजा’ अचानक कोसळला; २ जणांचा मृत्यू, ५ जखमी”व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

जळगाव मधील पारोडा लोकेशन मधील१०८ रुग्णवाहिका जळाली…. BVG- सुमित यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न? ऑन कॉल असताना रुग्णवाहिका शॉर्ट सर्किट मुळे जळाली पायलट,डॉक्टर आणि रुग्ण सुखरूप

प्रतिनिधी :

शुक्रवारी २७ जून २०२५ रोजी रुग्णाला रुग्णालयात घेऊन जात असताना जळगाव जिल्ह्यातील पारोडा लोकेशन वर कार्यरत असणारी MH 14 CL 1317 क्रमांकाची रुग्णवाहिका रुग्णाला रुग्णालयात घेऊन जात असताना अचानक तिच्या इंजिन मधून धूर येताना जाणवले.पायलट आणि डॉक्टरांच्या प्रसंगावधान राखून रुग्णाला जळत असलेल्या रुग्णवाहिका मधून खाली उतरवले काही वेळाने त्या रुग्णवाहिकेने मात्र पेट घेण्यास सुरवात केली केली.मात्र पायलट आणि डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.मात्र या गोष्टीमुळे BVG आणि सुमित यांच्या कार्यक्षमतेवर मात्र प्रश्न उपस्थित होत आहेत.नादुरुस्त रुग्णवाहिका,त्यांची दयनीय स्थिती अगदी जीव मुठीत घेऊन या रुग्णवाहिकांचे पायलट रुग्णवाहिका चालवत असल्याचे वारंवार दिसत आले आहे.तरी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी असे नागरिकांचे मत आहे.

Scroll to Top