ताज्या बातम्या
धारावीकरांना ५००, चाळी-इमारतीतील रहिवाशांना १,००० चौ. फुटांची घरे द्या ; मास्टर प्लॅन व पुनर्वसनाची कायदेशीर हमी मिळेपर्यंत करार न करण्याचे आवाहन‘वाजवा शाळेचा गजर, नको रे बाबा पुन्हा गेट टू गेदर!’ जुन्या आठवणी, मैत्री आणि नातेसंबंधांचा वास्तववादी वेध; आवर्जून पाहावे असे नाटकखारघर हिल महापौर मॅरेथॉन’ स्पर्धेत आयुक्त डॉ. शिंदे यांची यशस्वी धावगणेशोत्सवाच्या उत्साहाला गालबोट! २२ फुटी ‘भुलेश्वरचा राजा’ अचानक कोसळला; २ जणांचा मृत्यू, ५ जखमी”व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

“महाराष्ट्र आशा रेडिओ पुरस्कारांची घोषणा; आशा भोसले यांच्या नावाने राज्यात प्रथमच महाराष्ट्र रेडिओ महोत्सव”

मुंबई : महाराष्ट्राच्या आणि मराठीच्या सांस्कृतिक जडणघडणीत महत्वाचा वाटा असलेल्या रेडिओ आणि आणि आकाशवाणी माध्यमातून विविध कलावंत, तंत्रज्ञ घडले. त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे महाराष्ट्र रेडिओ महोत्सव आयोजित करण्यात येत आहे.त्यानिमित्ताने महाराष्ट्रभूषण आशाताई भोसले यांचे नावे बारा महाराष्ट्र आशा रेडिओ पुरस्कार देण्यात येतील अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.
मंत्रालय वार्ताहर कक्षात पत्रकार परिषदेत मंत्री शेलार यांनी गेल्या 102 वर्षांतील रेडिओ या माध्यमाचा घडलेल्या सांस्कृतिक वाटचालीचा आढावा घेतला. येत्या एकवीस जून रोजी, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे हे पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते आणि कला सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान केले जातील.
हे पुरस्कार पुढीलप्रमाणे –
आशा रेडिओ जीवनगौरव पुरस्कार, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ पुरस्कार, महाराष्ट्र आशा कम्युनिटी रेडिओ पुरस्कार, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ मनोरंजन पुरस्कार, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ सांस्कृतिक पुरस्कार, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट पुरुष निवेदक पुरस्कार, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट महिला निवेदक पुरस्कार, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट नवोदित महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट मराठी निवेदक पुरस्कार, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट सामाजिक सौहार्द पुरस्कार, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट स्टोरी टेलरिंग पुरस्कार.
महाराष्ट्रभूषण आशाताई भोसले यांनी या महोत्सवात यावे यासाठी निमंत्रण देणार आहे असेही यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री शेलार यांनी सांगितले.

Scroll to Top