ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

सुप्रसिद्ध निवेदक संतोष लिंबोरे-पाटील यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा मानाचा पुरस्कार

मुंबई : रंगभूमीवरील बहुआयामी योगदानाची दखल घेत सुप्रसिद्ध निवेदक आणि लावणी कलावंत महासंघाचे संस्थापक अध्यक्ष श्री. संतोष लिंबोरे-पाटील यांची अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देत असलेल्या “श्रीमती शिबानी जोशी पुरस्कृत कै. भालचंद्र त्र्यंबक जोशी स्मृति सर्वोत्कृष्ट निवेदक पुरस्कार” यासाठी निवड करण्यात आली आहे.

या पुरस्काराने निवेदन क्षेत्रात त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण आणि प्रभावी कार्याचा सन्मान होत असून, ते गेली अनेक वर्षे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांतून आणि विशेषतः लावणी-नाट्य परंपरेच्या संवर्धनासाठी सक्रिय आहेत. लावणी कलावंत महासंघाच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे मोठे कार्य केले आहे. या वर्षीचा पुरस्कार वितरण सोहळा शनिवार, १४ जून २०२५ रोजी दुपारी ४.०० वाजता यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा (मुंबई) येथे संपन्न होणार असून, या सोहळ्याला अनेक नामवंत नाट्यकर्मी, कलावंत व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर आणि प्रमुख कार्यवाह अजित भुरे यांनी लिंबोरे-पाटील यांचे अभिनंदन करत सर्व नाट्यप्रेमींना या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
या निवडीमुळे मराठी रंगभूमीच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या निवेदकांमध्ये आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण आहे.
Scroll to Top